spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

पाचव्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी ढोकेश्वर मंदिर फुलले !

पाचव्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी ढोकेश्वर मंदिर फुलले

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२, पारनेर (अ.नगर) : श्रावण महिन्यातील शेवटच्या आज पाचव्या श्रावणी सोमवार निमित्त पुरातन पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री.ढोकेश्वरला भाविकांची मांदियाळी पहायला मिळाली पहाटे पाच वाजता ढोकेश्वर मंदिरातील पिंडीला दही दुग्ध असा महाजलाभिषेक करून पुजा करण्यात आली. यानंतर डमरू व शंखनाद करत गोसावी कुटुंबीयांच्या वतीने विधिवत साज चढवला पहाटेपासूनच आबालवृद्ध भाविकांनी श्रींचे दर्शनासाठी ढोकेश्वर मंदिरात गर्दी केली होती. त्यामुळे भाविकांनी ढोकेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन मंदिर प्रदक्षिणेचा मार्ग भाविकांनी हर हर महादेव,बम बम भोले,शी ढोकेश्वर महाराज की जय जयघोषात मंदिर परिसर भाविकांनी अक्षरशः फुलून गेले होते. यावेळी शिव पिंडीला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती.
सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शिवाची आराधना केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसरातील ग्रामदैवत श्री ढोकेश्वर महादेवाचे रुप मानले जाते. यामुळे भाविकांची या संपूर्ण महिन्यात श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी असते. विशेषत्वाने श्रावणी सोमवारी पहाटेपासूनच महिला भाविकांची मोठी मांदियाळी या ठिकाणी होत असते. पाचव्या श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी संपन्न झाले.

नवचैतन्य, आत्मिक समाधान मिळते…

दर श्रावणी सोमवारी श्री ढोकेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतो. मंदिरात आल्याने एक नवचैतन्य आणि आत्मिक समाधान मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पवित्र श्रावण सोमवार उपवास करतो आणि श्रींचे दर्शन घेऊन धन्य पावतो. – अंकुश पायमोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर तालुका उपाध्यक्ष

ओम नमः शिवाय जप करणे क्रमप्राप्त !

यंदा श्रावणामध्ये पाच श्रावणी सोमवार आले आहेत. पाचव्या श्रावणी सोमवारी शिवमुठ जवस महादेवाच्या पिंडीवर वहायची आहे. लाभप्राप्तीसाठी सदरचे शिवमुठ वाहून मुखी ओम नमः शिवाय जप करणे क्रमप्राप्त आहे. अनेक भक्तांचा देवाधिदेव महादेवांवर विश्वास आहे. त्यामुळे पवित्र श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये उपवास करून श्रींना प्रसन्न केले जाते.

– अभय गोसावी, पुजारी, श्री. क्षेत्र ढोकेश्वर देवस्थान

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: