नाभिक समाजातर्फे स्मशानभुमीसाठी प्रशासनाला इशारा !
अक्षराज : बहादुर चव्हाण
दि १५, छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील नाभिक समाजाच्या स्मशानभुमीत अंत्यविधीसाठी वारंवार येणारे अडथाळे आणि विरोध थांबण्यासाठी अभिलेख तयार करून समाजाच्या नावे समशानभुमी करण्यात यावी. अशी अनेक दिवसापासून मागणी असून वृद्ध महिलेचा मृतदेह तहसिल कार्यालयात अंत्यविधी साठी आणला व केसांच्या पाय घडया असे आंदोलन केले प्रत्येक वेळी आश्वासन दिले गेले. म्हणून १५ सप्टेबर रोजी मयत वृद्धाचा अंत्यविधी राज्य मार्गावर करण्याचा इशारा समाजातर्फे दिला होता. अखेर लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने अंत्यविधी पुर्वीच्या जागेवर केला. परंतु यापुढे ताकाळ कार्यवाही न झाल्यास यापुढचा अंत्यविधी उपविभागिय कार्यालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मौजे शिवना येथील नाभिक समाजाला एक महिन्याच्या आत नियमाप्रमाणे स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून देण्याबाबत तालुका दडाधिकारी तथा तहसिलदार सिल्लोड यांनी २९ जुलै रोजी मयत वृद्धेचा मृत देह तहसिल कार्यालयात आणल्या नंतर दिलेल्या लेखी आश्वासनाचे पत्र दिले होते. त्यानंतर १ जानेवारी रोजी नाभिक संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तहसिलदार यांना केसांचा हार व दालनात केसांच्या पायघडया टाकून आंदोलन करण्यात केले. परंतु स्मशान भुमितील अतिक्रमण न हटवता व मोजमाप करून स्मशान भुमी अभिलेख समाजाच्या नावे करण्यात आली नाही. म्हणून १५ सप्टेंबर रोजी राज्य रस्त्यावर नाभिक वृद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पत्र समाजा तर्फे दिले होते. अखेर स पो नि अमोल ढाकणे, पत्रकार दादासाहेब काळे यांच्या मध्यस्थी नंतर महसुली अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर पुर्वीच्या स्मशान भुमीत मयत उत्तमराव नारायण पंडीत वय ६८ यांचा अंत्यसंस्कर करण्याचे ठरले. परंतु सदर अंत्यसंस्कार प्रसंगी शेजारील शेतकऱ्यांनी पुन्हा अडथळा निर्माण करत गोंधळ सुरू केला. सदर बाब अजिंठा पोलीसांना कळवण्यात आली. तो पर्यंत अंत्यविधीसाठी जमलेल्या महिलांनी रौद्र रूप धारण करताच सदर शेतकऱ्यांनी तेथुन पळ काढला. अजिंठा पोलीसांनी बंदोबस्तात अंत्य विधी पार पाडला.
या स्मशान भुमीत समाजाला वारंवार अंत्यविधी करतांना अनेक अडचणी व विरोधाचा सामना करावा लागतो. यामुळे यापुढे जमाव हिंसक झाल्यास भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महसुली प्रशासनाने सदर स्मशान भुमी नाभिक समाजाच्या नावे करून अडथळे दुर करावे अन्यथा या पुढील अंत्यविधी उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे करण्यात येईल अशा इशारा राष्ट्रीय नाभिक संघटना मराठवाडा संर्पक प्रमुख दादासाहेब काळे, जिल्हा अध्यक्ष दिलीप गवळी, जिल्हा संघटक सुनिल वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा सांडू वाघ, भगवान दत्तू पंडित,
सुपडू बाबुराव पंडित, सुनील बाबुराव वर्पे, संदीप रंगनाथ पंडित, कैलास पंडित, संतोष भिकाजी वाघ (तालुकाध्यक्ष), विजय संजू पंडित, अशोक वर्पे, अतुल वाघ, अशोक वाघ, गजानन वाघ यांच्यासह नाभिक बांधव यांनी दिला आहे. तेव्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.