spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

 शिळ गावात घंटागाडी बेपत्ता ! नागरिकांच्या घरात कचऱ्याचा ढिगारा जमा…

 शिळ गावात घंटागाडी बेपत्ता ! नागरिकांच्या घरात कचऱ्याचा ढिगारा जमा…

अक्षराज : विनोद वास्कर
दि. २८, शिळफाटा (ठाणे) : शिळ गावामध्ये ३ दिवस झाले घंटागाडी येत नसल्यामुळे ३ दिवसाचा कचरा ग्रामस्थांच्या घरामध्ये जमा झाला आहे. त्यामुळे कचऱ्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकाही निर्माण होऊ शकतो. घंटागाडी लवकरात लवकर चालू करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदें संपर्कही साधला आहे. लवकरच घंटागाडी चालू होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. डायघर गावातील घनकचरा प्रकल्प येथे स्वतः सहाय्यक आयुक्त पाहणी करण्यासाठी गेले आहेत. ठेकेदाराला पैसे मिळत नसल्यामुळे ठेकेदारांनी काम बंद केला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जोपर्यंत घंटागाडी चालू होत नाही तोपर्यंत नागरिकांच्या घरांमध्ये हा कचऱ्याचा ढिगारा जमा झालेला दिसेल. करोडो रुपये खर्च हा घनकचऱ्यासाठी खर्च केला जातो तो पैसा कोणाच्या खिशात जातो ? असे प्रश्न आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: