spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

दिव्यातील धर्मवीर नगर येथील रस्त्यालगतचा कचरा उचला… अन्यथा पालिका कार्यालयासमोर कचरा टाकू….

दिव्यातील धर्मवीर नगर येथील रस्त्यालगतचा कचरा उचला…

अन्यथा पालिका कार्यालयासमोर कचरा टाकू….

अक्षराज : विनोद वास्कर

दि. २९, दिवा (ठाणे) : दिव्यातील धर्मवीर नगर येथे रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणारा कचरा पालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत उचलण्यात येत नाही. परिणामी नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. हा कचरा तातडीने उचलण्यात यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला संघटिका ज्योती पाटील यांनी केली आहे.

दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे दिवा आगासन या मुख्य रस्त्याच्या कडेला कचरा टाकून दिलेला असतो. या ठिकाणी छोटे डंपिंग ग्राउंड तयार झाले आहे. याकडे पालिकेच्या घनकचरा विभागाचे संपूर्णतः दुर्लक्ष झाले असून रस्त्याच्या कडेला कचरा साठवून राहिल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे येथे नागरिकांना चालायला ही जागा उपलब्ध राहत नाही. याची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हा कचरा उचलण्यात यावा, अन्यथा नागरिकांच्या सहकार्याने हा कचरा उचलून पालिकेच्या कार्यालय टाकला जाईल असा इशाराही ज्योती पाटील यांनी दिला आहे. दिव्यात कचऱ्याची समस्या गंभीर झाली असून पालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देत नाही दिवा शहराच्या स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ज्योती पाटील यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: