श्री ढोकेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न १२ % लाभांश जाहीर
अक्षराज : वसंत रांधवण
दि.२९, पारनेर (अ.नगर) : श्री ढोकेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित टाकळीढोकूश्वर या संस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बबन महाराज पायमोडे सभागृहात नुकतीच संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब किसन लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरण संपन्न झाली. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्हा. चेअरमन विलास झावरे, संस्थापक संचालक चंद्रकांत खिलारी,पाराजी वाळुंज,भागुजी झावरे, विजयकुमार कटारिया, रामचंद्र रोकडे हरिभाऊ दुधावडे, किसन काळनर काशिनाथ खटके,आदिकराव खेमनर लाभले. संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब लोंढे व सर्व पाहुण्यांच्या व संचालकांच्या हस्ते इयत्ता १० वी व १२ वी मध्ये प्रथम व द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व बक्षीस वितरण करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शिवाजी काळनर यांची कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार प्रशिक्षण अधिकारी प्रा. मानकर मॅडम यांनी उपस्थित संचालक कर्मचारी व सर्व सभासदांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.
अहवाल व विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत पायमोडे यांनी केले. अहवालातील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. चेअरमन भाऊसाहेब लोंढे यांनी संस्थेचा कारभार सुरळीत व पारदर्शक चालू असून संस्थेची कर्ज वसुली जोमाने सुरू आहे. त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे या वर्षासाठी सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमात यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन गायखे सर यांनी केले. तर आभार व्यवस्थापक प्रशांत पायमोडे यांनी मानले.