spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

अज्ञात समाजकंटकांकडून एका महाराजांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध…

अज्ञात समाजकंटकांकडून एका महाराजांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध…

मुदखेड बाजारपेठ बंद ; शहरात तणावपूर्ण शांतता…

अक्षराज : साहेबराव गागलवाड
दि.६, मुदखेड (नांदेड) : मुदखेड शहरात अज्ञात समाजकंटकांकडून एका महाराजांच्या प्रतिमेस जोडे मारून आपला निषेध नोंदविल्या प्रकरणी दोन समाजात तणाव निर्माण होऊन आज रविवारी आठवडी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
अचानक पाळण्यात आलेल्या बंदमुळे किरकोळ व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे मालाचे मोठे नुकसान झाले. मुदखेड पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे दोन समाजात होणारा उद्रेक टळला असून शहरात तणावपूर्ण वातावरणानंतर दुपारी शांतता निर्माण झाली असल्याचे दिसून आले. काही उत्साही मंडळींनी आपसात चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली बाजारपेठ बंद ठेवली.
दरम्यान शहरात पोलिसांचा मोठा लवाजमा दाखल झाला व जमावास पांगविण्यात आले.
तर दुसऱ्या घटनेत… येथील एका कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून धार्मिक भावना दुखविल्या प्रकरणी एका महाराजा विरुद्ध  गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदरचा गुन्हा गाजियाबाद उत्तर प्रदेश या ठिकाणी वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अन्य एका घटनेत दोघांविरुद्ध पोलिसांनी एनसी नोंद केली असल्याची समजते.
शहरामध्ये झाल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी कळविल्यानंतर भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक  डॉ. खंडेराव धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन हे तातडीने पोलिसांच्या लवा जाम्यांसह शहरात दाखल झाले व शहरातील दोन्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व व्यापाऱ्यांना बोलावून पोलीस ठाण्यात एका बैठकीत शांतता ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली व शहरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारनंतर हळूहळू बाजारपेठेत काही व्यवहार सुरळीत सुरू झाले वैद्यकीय सेवा ही सुरळीतपणे सुरू होती. दरम्यान शहरात उद्भवलेल्या या तणावाच्या परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांतता निर्माण व्हावी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य ती खबरदारी म्हणून मुख्य ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त अद्यापही ठेवण्यात आला असून शहरातील नागरिकांनी सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून शांतता राखावी असे आवाहन या निमित्ताने पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: