spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

टाकळी ढोकेश्वरच्या सरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला !

टाकळी ढोकेश्वरच्या सरपंचावरील अविश्वास ठराव फेटाळला !

१५ पैकी फक्त ५ सदस्य हजर १० गैरहजर..

अरुणा खिलारी सरपंचपदी कायम…

अक्षराज : वसंत रांधवण
दि.११, पारनेर (अ.नगर) : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सरपंचावर घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी शुक्रवार (दि. ११) दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. या सभेला १० सदस्य गैरहजर हाेते. ठराव पारित करायला एक सदस्यांची आवश्यकता असल्याने तसेच ५ सदस्य उपस्थित असल्याने हा अविश्वास प्रस्ताव फेटाळला.
सरपंच अरुणा प्रदिप खिलारी यांच्यावर अविश्वास ठराव घेण्यासंदर्भात काही ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवारी (दि.७) रोजी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्याकडे अविश्वास ठरावा विषयी तक्रार केली हाेती. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी दुपारी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बाेलावण्यात आली हाेती. तक्रारीवर उपसरपंच रामभाऊ तराळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सिताराम खिलारी, सुनिता जयसिंग झावरे, अर्चना बापूसाहेब रांधवण, सुनील चव्हाण, दत्तात्रय आनंदा निवडुंगे, गंगाधर निवडुंगे, शुभम सुनील गोरडे, सुमन दिपक साळवे, किशोर गायकवाड, कमल भाऊसाहेब खिलारी, यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने या सर्वांना सभेला उपस्थित राहण्याची नाेटीस बजावण्यात आली हाेती.

या ग्रामपंचायतची सदस्यसंख्या १५ असून, सरंपचाची निवड सदस्यांमधून करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अविश्वास ठराव आणलेल्या ११ सदस्यांपैकी रामभाऊ तराळ, सुनिता झावरे, दत्तात्रय निवडुंगे,गंगाधर निवडुंगे, सुनील चव्हाण असे ५ सदस्य विशेष सभेला उपस्थित राहून मतदान केले. ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ३५ अन्वये १५ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या, ठिकाणी १५ चे ३/४ म्हणजे ११.३५ मते होतात म्हणजे पुरणांकात १२ सदस्यांनी मते आवश्यक आहेत. या ठिकाणी फक्त ५ सदस्य उपस्थित असल्याने कोरम अभावी १० विरुद्ध ५ ने अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे.
यावेळी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्या समोर सरपंच अरुणा खिलारी यांच्यावरील अविश्वास ठराव विशेष सभेत आला नाही. त्यामुळे चर्चा आणि हात उंचावून मतदान केले. अविश्वास ठराव बारगळल्याची माहिती तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी दिली. यावेळी मंडलाधिकारी पंकज जगदाळे, तलाठी एम. आर. उंडे, ग्रामविकास अधिकारी बी. एम. दावभट उपस्थित होते.
यावेळी नारायण झावरे साहेब,अहमदनगर शहर संदिप घाडगे, जिग्नेश जग्गड,धोंडिभाऊ शेटे, प्रकाश गायकवाड, सचिन आल्हाट, गंगाधर बांडे, सोमनाथ बांडे, बाजार समितीचे माजी उपसभापती विलास झावरे,विलास नाईकवाडी,शिराज हवलदार, बापूसाहेब रांधवण, दिपक साळवे, अशपाक हवलदार, माजी सरपंच शिवाजी खिलारी, किशोर गायकवाड, शुभम गोरडे,संजय झावरे, विलास धुमाळ, राजेंद्र झावरे, देविदास आल्हाट, सुभाष महाजन जाधव, शुभम निवडुंगे, गोरक्ष निवडुंगे, लक्ष्मण झावरे, बबन झावरे, बबन हरिभाऊ बांडे, बबन सोनबा बांडे, सुरेश झावरे, ज्ञानदेव पायमोडे, तुषार गोरडे, शिवाजी गायकवाड,सौरभ कटारिया, सुहास बांडे, दामोदर झावरे, मंथन गायकवाड, कुंडलिक गायकवाड,ठका गागरे, बाबासाहेब गागरे, निहाल हवलदार, बाबासाहेब सखाराम झावरे, युवराज खिलारी, प्रसाद खिलारी, योगेश खिलारी, दादा निवडुंगे, शिरीष गोरडे, संदिप थोपटे, शिवाजी थोपटे, केशव धुमाळ, भानुदास खिलारी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्यासमोर मागिल सोमवारी (दि.७) रोजी ११ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्याने येत्या शुक्रवारी ११ ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सभेत ५ सदस्य उपस्थित याप्रमाणे ठराव आला नसल्याने तो बारगळल्याची माहिती तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी दिली.

टाकळी ढोकेश्वर गावच्या विकासासाठी व शांततेसाठी तसेच गावात चूकीचा पायंडा पडणार होता. त्याल चपराक बसावी म्हणून आमच्या भगीनी सरपंच अरुणा खिलारी यांच्या मागे आम्ही ठाम पणे उभे राहून निर्णायक भूमिका घेणारे नारायण झावरे साहेब, माजी सरपंच शिवाजी खिलारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो.

– महेश पाटील, अध्यक्ष, आदर्श गाव टाकळी ढोकेश्वर

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: