spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

शिळ दिवा रोडवर प्रवास ठरतो आहे जीवघेणा, लाखोच्या संख्येने खड्डे

शिळ दिवा रोडवर प्रवास ठरतो आहे जीवघेणा, लाखोच्या संख्येने खड्डे

अक्षराज : विनोद वास्कर
दि. १५, दिवा (ठाणे) : शिळ दिवा मार्गावर प्रवास करत आहेत तर मग तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय घेऊन चालले आहेत. तुम्ही म्हणाल असं का बोलताय कारण या शिळ दिवा मार्गावर लाखोच्या संख्येने खड्डे पडले आहेत. शिळ परिसरातील, दिव्यातील जनता नोकरीसाठी, विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला उपचार घेण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, प्रवास करत असतात. लाखोच्या संख्येने खड्डे पडल्यामुळे प्रवास करताना नागरिकांच्या मणक्याला, कमरेला त्रास होऊ लागले आहे.

तसेच वाहन चालकांना सुद्धा मेंटेनेसचा खर्च वाढला आहे. चांगले रस्ते देता येत नसतील तर आरटीओ विभागाकडून कारवाई का करतात असा सवाल आता शिळ परिसरातील, दिव्यातील नागरिक करू लागले आहेत. रस्ता बनवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर चंदा जमा करून तुम्हाला देतो असे शिळ परिसरातील, दिव्यातील नागरिक आता म्हणू लागले आहेत. हाकेच्या अंतरावर दिवा प्रभाग समिती आहे. दररोज अधिकारी या मार्गावरून जात असतात तरीसुद्धा कानाडोळा करत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन खड्डे बुजवणार का? प्रवासांना दिलासा देणार का? ठाणे आयुक्त सौरव राव साहेब आपण लवकरात लवकर दखल घ्यावी शिळकर, दिवेकरांची मागणी.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: