spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

गोळीबार प्रकरणानं हादरला; आता गॅलक्सी अपार्टमेंट कायमचं सोडणार सलमान खान

मुंबई : सलमान खानच्या आयुष्यात मागच्या आठवड्यात मोठी घडामोड घडली. सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार झाला. मागच्या रविवारी 14 एप्रिल रोजी ही घटना घडली. आता आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

या घटनेने केवळ सलमान खानच नाही तर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री हादरली आहे. गोळीबार प्रकरणानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे.

सलमान खान गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. आई वडिलांसाठी सलमानने या घरात एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र घरावर झालेल्या हल्ल्यानंतर आता सलमानने हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या एका जवळच्या मित्रानं ही माहिती दिली आहे. सलमान खान आता त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये राहायला जाणार असल्याची माहिती आहे.

भाईजान कायमचा पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये शिफ्ट होऊ शकतो. अभिनेत्याच्या मित्रानं एका मीडिया पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, ‘भाईजान त्याचा जास्तीत जास्त वेळ फार्म हाऊसवर घालवतो. त्याला तिथं राहायला आवडतं. ते लोकेशनही त्याच्या ‘बिग बॉस’ लोकेशनच्या जवळ आहे. शहरात त्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे सलमान त्याच्या फार्महाऊसवर राहायला जाण्याचा गंभीरपणे विचार करत आहे.’ अशी माहिती दिली आहे. मात्र, यावर सलमानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

या घटनेनंतर सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या अभिनेत्याला महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वीच ‘वाय प्लस’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: सलमान खानच्या घरी भेटण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचंही आश्वासन दिलं आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, नुकतंच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. तो ‘एआर मुरुगादास’ सिकंदर या चित्रपटात दिसणार आहे. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सलमान आजही वयाच्या 58 व्या वर्षी त्याच्या आई-वडिलांसोबत एकाच इमारतीत राहतो. पण सलमान खान राहत असलेलं हे घर फक्त 1 BHK फ्लॅट आहे. सलमान खानचं सी-फेसिंग गॅलेक्सी अपार्टमेंट हे सर्वात लोकप्रिय घरांपैकी एक आहे. त्यांचं घर बाहेरून पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असतात. ‘गॅलॅक्सी’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सलमानचं कुटुंब राहतं. तर सलमान तळमजल्यावर राहतो. रिपोर्ट्सनुसार, सलमानच्या या 1 BHK घराची किंमत 100 कोटी रुपये आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: