spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

लंडनमध्ये होणार अनंत-राधिकाचं लग्न; 3 दिवस चालणार सेलिब्रेशन, नीता अंबानी करत आहेत खास तयारी

Anant Ambani-Radhika Merchant Wedding:अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा विवाहपूर्व उत्सव जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला होता. अंबानी कुटुंबासोबत सेलिब्रेशन करण्यासाठी जगभरातील नामवंत लोक गुजरातच्या जामनगरमध्ये पोहोचले होते.

रिहानापासून ते एकॉनपर्यंत बी-टाउनच्या सर्व सुपरस्टार्संनी या भव्य कार्यक्रमाचा भाग होता. हा कार्यक्रम इतका भव्य होता की, सर्वांनाचं त्याचे आश्चर्य वाटले. मात्र, आता लग्नाचा उत्सव कोणाच्याही कल्पनेपेक्षा अधिक नेत्रदीपक असणार आहे.

जुलै महिन्यात लंडनमधील स्टोक पार्क इस्टेटमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह होणार आहे. या लग्नाची तयारी सुरू असून नीता अंबानी यासाठी खास तयारी करत आहेत. याआधी या जोडप्याच्या लग्नाआधीच्या उत्सवादरम्यान, अनंतने आपल्या आईबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली होती आणि तीन दिवसांच्या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतल्याचे श्रेय तिला दिले होते. (हेही वाचा –

लंडनमधील लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. याआधी, व्हायरल झालेल्या जामनगर प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये पाहुण्यांना ड्रेस कोडच्या सूचनांसह आमंत्रणे पाठवली होती. यावेळी लंडनमधील इव्हेंटसाठीही खास ड्रेस कोड असणार आहेत.
अंबानी त्यांच्या भव्यतेसाठी आणि उत्कृष्ट आदरातिथ्यासाठी ओळखले जातात. स्टोक पार्क येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या थीमबाबत बरेच तपशील नसले तरी ही कॉकटेल/संगीत रात्री असल्याचे म्हटले जात आहे. तात्पुरत्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान, सलमान खान, बच्चन कुटुंब, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, विराट-अनुष्का, रणबीर-आलिया, विकी-कतरिना आणि इतर अनेक नावांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: