spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img

चिन्मयनंतर कोण साकारणार शिवरायांची भूमिका? दिग्पाल लांजेकरांनी दिलं उत्तर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता चिन्मय मांडलेकरनं काल एक मोठी घोषणा केली आहे. छत्रपती शिवरायांची भूमिका चिन्मयने अगदी चपखलपणे साकारली होती. पण मुलाच्या नावावरून सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळं त्यानं यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे.

चिन्मय मांडलेकर ने याआधी शिवराज अष्टकातील सहा सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे. पण मध्यंतरी त्याच्या अकरा वर्षाच्या मुलाच्या नावाची चर्चा झाली. चिन्मयनं मुलाचं नाव ‘जहांगीर’ असं का ठेवलं यावरून त्याला आणि कुटूंबियांना नेहमीच ट्रोल करण्यात येतं. त्यानंतर ट्रोलिंगला कंटाळून चिन्मयने ही भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयावर आता अनेक कलाकार आणि प्रेक्षक विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आता शिवराज अष्टकाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकरने चिन्मयच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या पराक्रमांवर आधारित ८ सिनेमे बनवण्याचा निर्णय घेतला. त्यातील ‘फर्जंद’, ‘फक्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ आणि ‘छावा’ हे सहा सिनेमे रिलीज झाले आहेत. या शिवराज अष्टकाच्या सिनेमांच्या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या सहाही सिनेमात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची देखील पसंती मिळाली. पण आता यानंतर चिन्मयने या भूमिकेचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता शिवराज अष्टकातील उरलेल्या दोन सिनेमात शिवरायांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता चिन्मयच्या या निर्णयावर शिवराज अष्टकाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतंच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, ‘माझी अजून त्यासंदर्भात चिन्मय यांच्याशी कोणतीही चर्चा नाही झाली. आमचं एक जुजबी मेसेजच्या रुपात बोलणं झालं आहे. पण हा निर्णय घेण्याआधी काहीच चर्चा झाली नाही. चर्चा आज होणं आज अपेक्षित आहेत. शिवराज अष्टकमधील शिवाजी महाराजांची भूमिका माझ्या मते अजूनतरी चिन्मयच करणार आहेत. आमच्यात चर्चा झाल्यावर अंतिमतः काय निष्पन्न होईल ते कळेल. सध्या मी काही बोलायला समर्थ नाही, आणि मला अनेक गोष्टींची कल्पना नाही.’

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: