spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एक हजारहून अधिक वृक्षलागवड

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त एक हजारहून अधिक वृक्षलागवड

अक्षराज : जे. के. पोळ 
दि.२२, नेरूळ (नवी मुंबई) : २२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिन’(अर्थ डे) म्हणून साजरा केला जात असून पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचारपूर्वक वापर करणे आणि वाढते प्रदूषण रोखून पर्यावरणाचे संतुलन राखणे याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘वसुंधरा दिन’ अत्यंत महत्वाचा मानला जातो.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागतिक वसुंधरा दिवस (अर्थ डे) निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त उद्यान विभागाच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मोठया संख्येने वृक्षारोपण करण्यात आले. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते सेक्टर २६, नेरुळ येथील झोटींगदेव मैदान याठिकाणी पिंपळवृक्ष रोपाची लागवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त शिरिष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, उद्यान विभागाचे उपआयुक्त दिलीप नेरकर, नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त अमोल पालवे, कार्यकारी अभियंता राजेश पवार, उद्यान अधिक्षक भालचंद्र गवळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
त्याचप्रमाणे वसुंधरा दिनानिमित्त नवी मुंबईत ९ विविध ठिकाणी एक हजारहून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे लागवड करण्यात आलेली सर्व वृक्षरोपे ही देशी प्रजातीची होती. ज्यामध्ये पिंपळ, वड, बहावा, बकुळ, ताम्हण, सोनचाफा, जांभुळ, कदंब अशा देशी वृक्षरोपांचा समावेश होता. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्राधान्याने पक्षांना हवेहवेसे वाटेल अशी फळे व फुले असलेली देशी वृक्षरोपे लागवड करण्यात यावीत व या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या जैवविविधतेमध्ये लक्षणीय भर पडेल अशा वृक्षरोपांची लागवड करण्याच्या सूचना दिलेल्या असून त्यानुसार फळाफुलांनी बहरणारी वृक्षरोपे लावण्यात येत आहेत.
वसुंधरा दिनानिमित्त नेरुळ सेक्टर – २६ येथील झोटींगदेव मैदानाप्रमाणेच वाशी सेक्टर – १० येथील मीनाताई ठाकरे उद्यान, पामबीच मार्ग सर्व्हिस रस्ता, से-१०, सानपाडा येथील संवेदना उद्यान, आर्टिस्ट व्हिलेज बेलापूर तलावानजिक, निसर्गोद्यान कोपरखैरणे, सेंट्रल पार्क घणसोली, ठाणे बेलापूर मार्गावर कोपरखैरणे भुयारी मार्गाजवळ, से-१४ ऐरोली गुरुद्वारा जवळ, दिघा रामनगर येथील बोराले तलावाजवळ अशा नऊ ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार एक हजाराहून अधिक वृक्षरोपांचे संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, उदयान अधिकारी, व स्वच्छता अधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. ही वृक्षारोपण मोहीम सुरूच असणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: