spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

विखेंच्या रॅलीत भाडोत्री गर्दी ; व्हिडिओ व्हायरल

विखेंच्या रॅलीत भाडोत्री गर्दी ; व्हिडिओ व्हायरल

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२३, अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी काल काढलेल्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात भाडोत्री गर्दी जमविण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नगरकरांनी संताप व्यक्त केला. या रॅलीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नेतेमंडळींच्या ताफ्यासह शेकडो भाडोत्री गाड्या आणण्यात आल्यामुळे शहरातील रस्ते अनेक तास बंद ठेवण्यात आले होते. शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाल्यामुळे नागरिकांना भर उन्हात ताटकळत रहावे लागले. हि रॅली मध्यवस्तीतून गेल्यामुळे येथिल बॅंका,भाजी मार्केटसह दुकाने जबरदस्तीने बंद करण्यात आली होती. तसेच एसटी बसेस स्थानकामध्ये अडकून पडल्यामुळे आणि बाहेरच्या बस शहरात येऊ न दिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एकंदरीत विखे यांचे अर्ज दाखल करण्यासाठीचे भाडोत्री शक्तिप्रदर्शन नगरकरांना मनस्ताप देणारे ठरले. दरम्यान, या रॅलीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याची चर्चा सुरू होती.
महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी काल उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत पदाधिकार्यांपेक्षा जमविण्यात आलेल्या भाडोत्री गर्दीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. गर्दी जमविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
रॅलीची सांगता होणारे ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे तेथील राष्ट्रीय व सहकारी बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच गर्दीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जाण्या – येण्यासाठी मार्गच नसल्यामुळे येथिल भाजी मार्केटही बंद ठेवण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांनी तेथील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हालअपेष्टा सहन करावी लागली.

भाडोत्रीचा व्हिडिओ व्हायरल !!
विखे पाटील यांनी रॅलीत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जमविण्यात आलेल्या गर्दीतील नागरिकांना पैसे दिले नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. विखे यांच्या रॅलीसाठी प्रचंड गर्दी जमविण्याचे आदेश महायुतीतील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून यंत्रणा कामाला लागली होती. या रॅलीसाठी जामगाव भागातून आलेल्या एका व्यक्तीने आम्हाला ५०० रुपये देतो, असे सांगितले होते, मात्र १०० रुपये सुद्धा दिले नाहीत, असा संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे विखेंच्या रॅलीत भाडोत्री गर्दी जमविल्याचा पर्दाफाश झाला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: