spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

दिवा शहरासह रेल्वे स्थानकातील पाणी विक्री जोमात

दिवा शहरासह रेल्वे स्थानकातील पाणी विक्री जोमात

अक्षराज : विनोद वास्कर

दि. २३,दिवा (ठाणे) : दिव्यातील पाणी टंचाईची झळ आता दिवा रेल्वे स्थानकाला देखील पडू लागली आहे. दिवा रेल्वे स्थानकात असलेल्या सर्व पाणपोई आता महिण्याभरापासून कोरड्या पडल्या आहेत. परिणामी दिवा रेल्वे प्रवाश्यांच्या घश्याला कोरड पडू लागली आहे. दिवेकरांचे पाणी टंचाईचे संकट कमी होताना दिसता दिसत नाही त्यात तीव्र उन्हाळयामुळे दिवा स्थानकातील प्रवाश्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे.

प्रचंड गर्दी असलेल्या दिवा रेल्वे स्थानकातून मुंबई, कर्जत- कसारा, वसई, पनवेल व कोकण येथे जाणारे लाखो प्रवासी रोज प्रवास करतात. दिवा स्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. रेल्वे प्रशासनाने दिवा स्थानकातील वॉटर वेंडिंग मशीन देखील हटवले आहे. दिवा स्थानकात वॉटर वेंडिंग मशीनला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत होता. तर फलाटावरील एकूण तीन पाणपोई सुरु करण्यात आल्या परंतू ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर त्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती.

दिवा शहरातील पाणी टंचाईमुळे पाणी विक्री व्यवसाय जोमात सुरु झाला असून ट्याकंरचे दर देखील वाढले आहेत थोडक्यात दिवेकरांना घरातील व बाहेर जाताना देखील रेल्वे स्थानकात विकतचे पाणी घ्यावे लागते. रेल्वे प्रशासनाने दिवा स्थानकातील प्रत्येक फलाटावर पाणपोईवर ताबडतोब पाणी सुरु करावे अशी मागणी करत आहेत. रेल्वे प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे. प्रकरणी रेल्वे प्रशासनाबद्दल प्रवाशी संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: