spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

परंपरेनुसार विखे कुटुंब खेळले रडीचा डाव !

परंपरेनुसार विखे कुटुंब खेळले रडीचा डाव !

डमी उमेदवारावरून महाविकास आघाडी झाली आक्रमक, विखे यांच्यावर गंभीर आरोप

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२७, अहमदनगर : विखे घराण्याच्या राजकारणाच्या परंपरेप्रमाणे यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी निलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळला आहे,असा आरोप शुक्रवारी महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के,आपचे संघटक सुभाष कोकाण उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या वतीने राजेंद्र फाळके म्हणाले, विखे डमीचा वापर अनेक ठिकाणी करतात. डॉ. सुजय विखे यांच्या डिग्रीबाबत त्यांच्या चुलत्यानेच उल्लेख केला आहे. रक्ताच्या नात्यातील असल्याचे भासविण्यासाठी दुसरी व्यक्ती उभी करून संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा आरोपही त्यांचे चुलते अशोक विखे यांनी केला होता.


महसूल विभागाच्या तलाठी भरतीमध्येही अनेक डमी उमेदवार पास झाले. अशाच प्रकारे डमी उमेदवार उभा करून डॉ. सुजय विखे यांनी आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे चालविली आहे. निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. नावातील साधर्म्य पाहून दिशाभूल करण्यासाठी डमी अर्ज दाखल करण्यात आला. जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या निघोजच्या मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर सतीश बळवंत लंके यांचे नाव आहे. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सुधारीत यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर निलेश साहेबराव लंके यांचे नाव आहे. निलेश साहेबराव लंके यांचे नाव निघोजच्या मतदार यादीत टाकण्यासाठी अशी कोणती शासकीय यंत्रणा पाळली,असा सवाल फाळके यांनी केला.
विखे कुटुंब निवडणूकीला घाबरले. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. आमच्याकडेही सुजय रमाकांत विखे व सुजय दिगंबर विखे हे दोघेही आले होते. आमचे डमी अर्ज दाखल करा, असे ते म्हणाले. आम्ही स्वारस्य नसल्याचे सांगत नकार दिल्याचे फाळके म्हणाले.

सूचक म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष….

निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासठी डॉ. सुजय विखे यांच्यासाठी डी. पी. अकोलकर यांनी स्टॅम्प खरेदी केला. त्यांनीच निलेश साहेबराव लंके यांच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प खरेदी केला आहे. एकाच वकीलाने दोघांचीही नेटरी केल्याचा दावाही फाळके यांनी केला आहे. तसेच भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल प्रकाशराव शिंदे यांची निलेश साहेबराव लंके यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी असल्याचाही दावा फाळके यांनी केला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: