spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

यावर्षी सर्वदूर भरपूर पाऊस ; नदी – नाल्यांना पूर

यावर्षी सर्वदूर भरपूर पाऊस ; नदी – नाल्यांना पूर

राहाता विरभद्र यात्रेत पुजारी भगत यांचे भाकित

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२७,राहाता (अ.नगर) : यावर्षी सर्वदूर चांगला व भरपूर पाऊस पडेल. नदी – नाल्यांना पूर येईल,खरिप व रब्बी हंगाम चांगला होईल पण पेरी दोन होतील, अशी भविष्यवाणी राहाता येथिल वीरभद्र यात्रेत वीरभद्र देवस्थानचे पुजारी सोमनाथ भगत यांनी केली.
वीरभद्र महाराजांच्या यात्रेत देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत हे प्रत्येक वर्षी पाऊस व येणारी पिके कसे असेल याचे भाकीत करतात. या वर्षापासून त्यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे चिरंजीव सोमनाथ भगत यांनी पावसाचे व पीक पेरणी कशी असेल याचे भाकीत केले. यात्रेची भविष्यवाणी ऐकण्याकरीता पंचक्रोशीतील नागरिक संपूर्ण रात्र जागे राहतात. पावसाबाबत झालेल्या भविष्यवाणीवर शेतकरी बांधव यावर्षीचे आपले आर्थिक गणिते कसे असेल याचा अंदाज लावतात. पुजारी सोमनाथ भगत यांनी सांगितले, यावर्षी सर्वदूर भरपूर व चांगला पाऊस पडेल. रोहिणी नक्षत्रात काही ठिकाणी भरपूर तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडेल. मृग नक्षत्रात भरपूर प्रमाणात पाऊस पडेल. आर्द्रा नक्षत्रात पूर्ण चांगला पाऊस होईल. खरिप व रब्बी हंगामात पेर होईल परंतु त्या दोन होतील अशी भविष्यवाणी पुजारी भगत यांनी केली.


भविष्यवाणी करण्याअगोदर पाच मातीच्या कच्च्या घागरी एका सरळ रेषेमध्ये ठेवून त्या घागरीवर देवीची घोंगडी अंथरली जाते. या पाण्याने भरलेल्या घागरीवरून मंदीराचे पुजारी तीन वेळेस चालतात. घागरी समोर पाच नागिनीच्या पानावर विडे ठेवले जातात. त्या विड्यांना नाव राजा, प्रजा, सुख, दुःख व दरिद्र्य असे नाव दिले जाते. या घागरी रीचल्यानंतर जो विडा जागेवर राहिला. त्याचा मानवतेला त्रास होतो. व घागरी रीचल्यानंतर ज्या दिशेने पाणी जास्त वाहील त्या दिशेला पाऊस जास्त होतो. अशा पद्धतीच्या भविष्यवाणी वरून शेतकरी बांधव व नागरिक या वर्षी पाऊस कसा होईल याचा अंदाज घेतात. यावर्षीची भविष्यवाणी करताना घागरी रीचल्यानंतर राजा नावाचा विडा जागेवर राहिला. नवसाला पावणारी ख्याती असलेल्या विरभद्र महाराज यांच्या यात्रेतील केलेल्या भविष्यवाणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून भगत परिवाराकडे भविष्यवाणी सांगण्याची पिढी जात परंपरा सुरू आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: