दिलिप खेडकर यांना पारनेर मधून विक्रमी मताधिक्य देऊ – प्रसाद खामकर
सुपा येथील प्रचार बैठकीत ग्वाही
अक्षराज : वसंत रांधवण
दि.२८, पारनेर (अ. नगर) :
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी उमेदवार दिलिप खेडकर यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करू, अशी ग्वाही सुपे येथे झालेल्या प्रचार बैठकीत देण्यात आली. दिलिप खेडकर यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त सुपा येथिल हाॅटेल वुडलॅंड येथे पारनेर तालुक्यातील ओबीसी बहुजन समाजाला आरक्षण, सामाजिक परिस्थिती, वंचित बहुजन ओबीसी समाजाचे प्रश्न इतर अनेक अडचणी विषयावर चर्चा करण्यात आली असून, दिलिप खेडकर हे ओबीसी उमेदवार असल्याने त्यांना पारनेर तालुक्यातून विक्रमी मताधिक्य देऊ अशी ग्वाही ओबीसी नेते प्रसाद खामकर यांनी या बैठकीत दिली.
यावेळी पुर्व प्रशासकीय अधिकारी तसेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलिप खेडकर यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रचार बैठकीला ओबीसी नेते प्रसाद खामकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंदीकर, समता परिषदेचे पारनेर तालुका अध्यक्ष बबनराव घुमटकर, उपाध्यक्ष वसंत रांधवण,धनगर समाजाचे नेते गजानन कुलाळ, माजी सरपंच संजय रासकर, अनिल गाडिलकर, माजी सरपंच बापू साबळे,सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित मेमाणे, अनंत श्रीमंदिलकर, रमेश गव्हाणे, दत्तात्रय भुजबळ, शरद वाघमोडे, महेश शिंदे, किरण नगरे, नगरे तात्या आदींसह ओबीसी बहुजन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.