साप्ताहिक राशिफल २९ एप्रिल ते ५ मे
मेष रास – येणारा सप्ताह तुमच्यासाठी अतिशय उत्तम सप्ताह आहे. आयुष्यात यु टर्न घ्यावा लागेल. तुमच्या करिअर साठी ही हा सप्ताह अतिशय उत्तम आहे. धनलाभ होईल. मनो बलही वाढेल. नाते संबंधात काही वितुष्ट आले असेल तर ते आता सुधारेल . जीवनातील काही मोठी मोठी कामे अपूर्ण राहिली असतील तर ती पूर्ण होतील.
वृषभ रास – या सप्ताहात तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल पण मनाजोगे यश मिळणार नाही. व्यापार धंद्यात कठोर परिश्रम घ्यावे लागतील सफलता ही मिळेल. तुमच्या परिवारातील वातावरण सामान्यच असेल. परिवारात कोणाशीही वाद विवाद करू नका. मोठी भांडणे होतील त्यातून मनस्ताप वाढेल.
मिथुन रास – खूप दिवसांपासून तुम्ही जे काम हाती घेतलेले आहे, त्यामध्ये यश मिळण्याच्या आधी थोडा अडथळा संपवतो. आरोग्य ही सांभाळावे लागेल. द्रव पदार्थांपासून इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक अशांती वाढेल जीवनसाथी सोबत वाद होऊ शकतात. मनातील नकारात्मक ते पासून लांब राहा.
कर्क रास – हा सप्ताह तुमच्यासाठी अतिशय उत्तम सप्ताह आहे. धनलाभ संभवतो. त्या योगे आर्थिक स्थितीही सुधारेल. व्यापार धंद्यात सफलता मिळेल. तुमच्या परिवारातील वातावरण ही आनंदी असेल. एकूणच तुमच्या जीवनात या सप्ताहात भरभराट होईल.
सिंह रास – हा सप्ताह तुमच्यासाठी अतिशय उत्तम व कल्याणकारी ठरेल. तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये काही करायचं असेल तर आता तुम्ही नवीन स्टार्टअप हि करू शकाल. मनोबल वाढेल. वडिलोपार्जित विरासत मिळेल. सप्ताह करिअर साठी अतिशय उत्तम आहे. तुमच्यावर असलेली जुनी कर्जे र्फिटतील. शत्रूलाही या सप्ताहात तुम्ही पराजित करू शकाल.
कन्या रास – या सप्ताहात तुमच्या नवीन नवीन समस्या वाढतील. फायनान्शियल स्ट्रगलही करावे लागेल. अगोदर पासूनच चालत असलेले नातेसंबंधातील वाद विवाद वाढतील. स्वास्थ्य ही खराब होईल. स्वास्थ्य सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी मात्र काहीतरी आनंदी वार्ता समजतील.
तुळ रास – या सप्ताहात तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन पराक्रम करून दाखवाल. करियर मध्ये तुम्ही नवीन स्टार्टअप कराल. पुढे जाल. तुमच्या जीवनातील संघर्ष आता संपुष्टात येतील. नवीन माणसांची भेट होईल. तुमच्या परिवारातील वातावरण अतिशय उत्तम आनंदी आनंदाचे असेल. मात्र जीवन साथीचा कुठल्याही कामात सल्ला घ्या, त्याने फायदाच होईल. या सप्ताहात मात्र मोठी गुंतवणूक करू नका.
वृश्चिक रास – या सप्ताहात तुमच्या जीवनात काहीतरी नवीन परिवर्तन होईल. व्यापार धंद्यात वृद्धी होईल. धन चिंता मात्र वाढेल. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. घरात व ऑफिसमध्ये संतुलित वातावरण ठेवा ते कल्याणकारी ठरेल.
धनु रास – अतिशय उत्तम सप्ताह आहे. या सप्ताहात तुमची पद प्रतिष्ठा वाढेल. धन चिंता संपुष्टात येईल. तुमच्या आवडीचे काम करण्याचा योग तुम्हाला या सप्ताहात येईल. नवीन स्टार्ट अप करायचे असेल तर योग्य वेळ आहे, त्यात तुम्हाला इतरांचीही मदत होईल. जीवनात आनंदी आनंद असेल त्यामुळे नवीन दृष्टिकोनातून जीवनाकडे तुम्ही पहाल.
मकर रास – हा सप्ताह तुमच्यासाठी उत्तम सप्ताह आहे. कल्याणकारी सप्ताह आहे. या सप्ताहात तुमची ही पद प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या संततीकडून तुम्हाला काहीतरी खुशखबर मिळेल. पण त्यासोबत मानसिक तणावही वाढेल. चिडचिड होईल तान तणाव वाढेल मात्र जीवनात नवीन परिवर्तन घडेल.
कुंभ रास – येणारा सप्ताह तुमच्यासाठी अतिशय कल्याणकारी सप्ताह असेल. अपार धन मिळेल. समृद्धी, यश कीर्ती,आनंद, पैसा सर्व काही मिळेल. नशिबाची साथ ही मिळेल पण धैर्याने पुढे जा.
मीन रास – या सप्ताहात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पराक्रम करून दाखवाल. तुमच्या कामांमध्ये तुम्हाला नवीन दिशा मिळेल. आत्मविश्वास, मनोबलही वाढेल. नवीन व मोठे निर्णय घेण्याचा योग येईल. मात्र सावधान ते पूर्वक सर्व कामे करा. सतत कार्यरत रहा. आपल्या बुद्धीचा सदुपयोग करून योग्य निर्णय घ्या.