spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा !

कल्याण लोकसभेत मनसेचा पदाधिकारी मेळावा

महाराष्ट्र दिनी डोंबिवलीत पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ डोंबिवलीत मेळावा

अक्षराज : विनोद वास्कर

दि.२९, डोंबिवली (ठाणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने कल्याण लोकसभेत मनसे कडून पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.या मेळाव्याला महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित असणार आहेत.

महायुतीच्या उमेदवाराला सर्वोच्च मतांनी निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र सैनिक कामाला लागले आहेत.पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका नुकत्याच मनसेचे कल्याण लोकसभा निरीक्षक व आमदार राजू पाटील यांच्या सोबत पार पडल्या आहेत.तर स्थानिक पातळीवर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या टीम शहर आणि ग्रामीण विभागात तयार करण्यात आल्या आहेत.त्यानुसार महाराष्ट्र सैनिक कामाला देखील लागले आहेत.कल्याण लोकसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला पदाधिकारी मेळावा महाराष्ट्र दिनी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा आमदार प्रमोद(राजू) पाटील व नेते- अविनाश जाधव हे संबोधित करणार आहेत. बुधवार दि.०१ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी माध्यमांना दिली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: