spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

“अक्षराज मीडिया” पत्रकारांसाठी नियमावली

“अक्षराज मीडिया” पत्रकारांसाठी नियमावली

नमस्कार… 🙏🏻

“अक्षराज मीडियाची” सुरुवात ही थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या शुभ आशीर्वादाने दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आली. “अक्षराज मीडिया” हे जनतेला न्याय मिळावा तसेच जनतेच्या समस्या सोडविल्या जाव्यात या हेतूने महाराष्ट्रभर कार्यरत आहे.

“नियमावली का….?”

पत्रकारांना काम करण्यासाठी सोपे व्हावे, मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावी. प्रामाणिकपणे काम व्हावे, पत्रकारांना शिस्त व समयसूचकता असावी हाच प्रामाणिक उद्देश.

१) “अक्षराज मीडियाला” पत्रकार होण्यासाठी काय आवश्यक?
● शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन असावे.
● पत्रकारितेची आवड व गोडी असावी.
● बातमीदारी विषयीचे ज्ञान असावे किंवा अनुभव असावा.
● सामाजिक किंवा राजकीय क्षेत्राचा अभ्यास असावा.
● प्रसार माध्यमांचे ज्ञान असावे.

कागदपत्रे –
● शैक्षणिक कागदपत्रे (मार्कशीट आणि टी. सी)
● पत्रकारिता कोर्स किंवा शिक्षण झाले असेल तर त्याची मार्कशीट
● आधार कार्ड दोन्ही बाजू
● पासपोर्ट साईज फोटो (स्पष्ट)
● विनंती अर्ज व हमी पत्र
● १५०० रु. जॉईनिंग फी (पोस्टल चार्जेस + इतर)

२) कामाचे स्वरूप –
● पत्रकारांनी दर १५ दिवसांनी होणाऱ्या ऑनलाइन बैठकीस उपस्थित असणे आवश्यक आहे.
● पत्रकारांनी वरिष्ठांच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
● पत्रकारांचे कोणतेही काम प्रोटोकॉल नुसारच होईल.

प्रोटोकॉल पुढीलप्रमाणे –
संपादक + सहसंपादक 👉 राज्य समन्वयक 👉 जिल्हा प्रतिनिधी 👉 विधानसभा प्रतिनिधी 👉 तालुका प्रतिनिधी 👉 शहर प्रतिनिधी 👉 गट प्रतिनिधी
● पत्रकारांची दरवर्षी (जानेवारी महिन्यात) पदोन्नती व पद अवनती करण्यात येईल.
● एखादा पत्रकार सलग २ महिन्यापर्यंत सक्रिय नसल्यास त्याची नियुक्ती रद्द करण्यात येईल.

बातमी विषयी महत्वाचे –
● पत्रकारांनी आठवड्यातून वृत्तपत्र (पेपर), न्यूज पोर्टल व न्यूज चॅनलला किमान ५ बातम्या पाठवणे बंधनकारक आहे.
● वृत्तपत्र (पेपर) साठीच्या बातम्या newsaksharaj2021@gmail.com या मेल आयडीवर सायंकाळी ७ वाजेपर्यंत अचूक व फॉरमॅटमध्ये पाठवाव्यात.
● न्यूज पोर्टल व न्यूज चॅनलच्या बातम्या रात्री ९ पर्यंत ८६०५३१३२०२ किंवा ९६१९१७५२७९ या व्हाट्सअपवर स्वीकारल्या जातील.
● पत्रकारांनी बातम्या या आपल्याला नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातूनच पाठवाव्यात.
● बातम्या विषयीचे सर्वस्वी निर्णय हे संपादकांचे असतील. त्यामध्ये पत्रकारांनी हस्तक्षेप करू नये.
● प्रकाशित झालेल्या बातम्या सर्व प्रसारमाध्यम्यांवर शेयर कराव्यात.

जाहीराती विषयी महत्वाचे-

● पत्रकारांनी वर्षभरात येणाऱ्या सण, उत्सवांना (गुढीपाडवा, वर्धापनदिन, दिवाळी व नववर्ष दिनदर्शिका) ठरवून दिलेल्या जाहिरातीचे टार्गेट पूर्ण करावे.
● जाहिरात पाठवताना जाहिरात व जाहिरातीची रक्कम एकसोबतच (जाहिरात कमिशन वजा करून) पाठवावे.
● पत्रकारांना जाहिरातींवर २५ टक्के जाहिरात कमिशन दिले जाईल. (जाहिरात प्रकाशित होईपर्यंत जाहिरात रक्कम जमा केल्यास कमिशन लागू, त्यानंतर कमिशन दिले जाणार नाही)
● जाहिराती सोबत जाहिरातीचे बील दिले जाईल.
● पत्रकारांनी जाहिरातीची रक्कम व कोणतेही आर्थिक व्यवहार संपादकांशिवाय करू नये.

आयकार्ड व नियुक्तीपत्र विषयी महत्वाचे –
● पत्रकाराची नियुक्ती झाल्यावर पत्रकाराला आयकार्ड व नियुक्तीपत्र त्यांचे काम बघूनच देण्यात येईल.
● पत्रकारांनी आयकार्ड व नियुक्तीपत्राचा कोणताही गैरवापर करू नये. तसे आढळल्यास तात्काळ नियुक्ती रद्द करण्यात येईल व गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

आपणांस जर “अक्षराज मीडिया” सोबत प्रामाणिक, निःपक्ष व निर्भीड काम करायचे असेल तर वरील नियमावली वाचून, लक्षात घेऊनच काम सुरु करावे.

आपल्या पत्रकारितेला मनःपूर्वक शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐

🙏🏻 धन्यवाद !!! 🙏🏻

: संपर्क :

श्री.विनोद कैलास गोरे
संपादक, अक्षराज मीडिया
मोबा.८६०५३१३२०२

प्राजक्ता चव्हाण गोरे
सहसंपादिका, अक्षराज मीडिया
मोबा.९६१९१७५२७९

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: