spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

सरेगावच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या !

सरेगावच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या ! रेल्वेच्या खाली दिला जीव…

अक्षराज : साहेबराव गागलवाड
दि.२३, मुदखेड (नांदेड) : मुदखेड तालुक्यातील सरेगाव येथील प्रकाश आनंदराव गिरे  वय ५३  यांनी सततच्या नापिकीला कंटाळून तसेच सावकारी व बँक कर्जाच्या सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा दिवसेंदिवस वाढतच असून मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या पहावयास मिळत आहेत. सध्या मागच्या दोन आठवड्या पूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात सर्वच पीक वाहून गेल्याने कर्ज कसे फेडावे व सावकाराच्या जाचामुळे चिंताग्रस्त शेतकरी प्रकाश आनंदराव गिरे यांनी धावत्या रेल्वेच्या समोर येऊन स्वतःचे आयुष्य संपविले आहे. बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज तसेच नापिकी व अतिवृष्टीने हातचे गेलेले पीक यामुळे गिरे चिंताग्रस्त होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्ये प्रकरणी पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: